गोल पोस्ट राष्ट्रीय मनगट घेऊन फरार झाला आरोपी.

मनगट घेऊन फरार झाला आरोपी.

लातूर: लातूर जिल्ह्यात हिंसक पणाची अतिशय धक्कादायक घटना घडल्याच समोर येतय.जळकोट जिल्ह्यात एका तरुणाचा हात तोडून त्याच मनगट घेऊन आरोपी फरार झाल्याची घटना समोर येतय. ही धक्कादायक घटना जळकोट तालुक्यातील चेरा या गावात झाली. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या संबंधित आरोपी तसेच जखमी व्यक्ति चा हात शोधण्यात पोलीसांना अजून तरी यश आलेले नाही.
प्रकाश माने असे जखमी व्यक्ति चे नाव आहे. प्रकाश चेरा पाटी गावाजवळ च्या ढाब्यावर जेवण करुन घरी येत असताना, मोटारसायकल वर येत असलेल्या पिराजी पिकले याने एका धारदार हत्याराने प्रकाश वर हल्ला केला.
पिराजी ने प्रकाश वर अतिशय जोरात वार केले, व त्याचे मनगट हाता पासून वेगळे करायचा प्रयत्न केला पण हात काही सहजासहजी तुटत नसल्याने पिराजी ने वारंवार जोरात त्या ठिकाणी वार केले, व प्रकाश चे मनगट स्वतः सोबत घेऊन पिराजी हा गाव सोडून फरार झाला. तरी घटना घडून चार दिवस झाले असून देखील आरोपी पिराजी तसेच प्रकाश चे मनगट शोधण्यास अद्याप ही पोलीसांना यश आलेले नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version