मध्यप्रदेशमध्ये आंब्याचा ट्रक उलटला; पाच जण जागीच ठार

मध्यप्रदेश, दि.१०मे २०२०: मध्यप्रदेश मधील नरसिंहपूरजवळ आंब्याचा ट्रक उलटून अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात ५ जण ठार झाले आहेत. तर ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंब्यांच्या ट्रक मधून काही नागरिक आपल्या गावी जात होते. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या दोघांना जबलपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर दुसऱ्या मजुराला फ्रॅक्चर आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी एकाला तीन दिवसापासून सर्दी, खोकला आणि ताप आहे. कोरोनाचा संशय असल्याने सर्व मजुरांची कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे कामगार मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जाताना दिसत आहेत. त्यातच हा अपघात झाल्याने या ट्रक मध्ये काही लोक आपल्या गावी जात होते.अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा