तर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देईन..!

राजीनामा देईन...

Manikrao Kokate Press Conference: विधानभवनात रमी गेम खेळल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्री धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची सभागृहतील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केली. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागल्याने कोकाटे अडचणीत आले आहेत.याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या रंजीनाम्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, आज (22 जुलै) माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. विरोधकांची होणारी मागणी बघता माणिकराव कोकाटे पत्रकार परिषदेत राजीनामा देतील का ? असे तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. “माझा फोन नवीनच असल्याने मला तो गेम स्कीप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याचा व्हिडीओ काढला आणि अधिवेश संपल्यावर व्हायरल केला.”

माणिकराव कोकाटे काय म्हणाले ?

तो फार किरकोळ विषय आहे. मात्र, त्याची इतकी चर्चा का होतेय तेच मला कळत नाहीये. मी याआधी त्यावर खुलासा केला आहे. तुम्हा लोकांना ऑनलाइन रमी हा काय प्रकार आहे ते माहीत आहे का ? असा गेम खेळताना तुम्हाला तुमचा फोन नंबर व बँक खाते क्रमांक देऊन नोंदणी करावी लागते. हा गेम आल्यापासून ते आतापर्यंतची माहिती तुम्ही तपसा. माझा नंबर किंवा खात अशा गेमशी संलग्न आहे का ते तपसा. जर मी सभागृहात रमी खेळलो अस वाटत असेल तर याप्रकरणी तपास करावा. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी यामध्ये दोषी आढळलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांनी येणाऱ्या नागपूर अधिवेशनात (हिवाळी) यावर निवेदन दिलं. तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केरेन.”

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर