इंफाळ,४ एप्रिल २०२३: बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमने गुरुवारी मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राला मदत करण्याचे आवाहन केले. ज्या ईशान्येकडील राज्यामध्ये हिंसाचार वाढला होता तेथे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात करण्यात आले होते. “मणिपूर जळत आहे, कृपया मदत करा,” असे ट्विट करत मेरी कोम यांनी हिंसाचाराचे फोटो शेअर केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले.
लष्कर आणि आसाम रायफल्स रात्री तैनात करण्यात आल्या होत्या, तसेच राज्य पोलिसांसह सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपर्यंत हिंसाचार रोखण्यात सैन्याला यश आले. आतापर्यंत, हिंसाचारग्रस्त भागातून सैन्याने ४,००० लोकांची सुटका केली असून त्यांना आश्रय दिला आहे.आणखी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे असेही त्यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्लॅग मार्च काढण्याचे व्यवस्था केली आहे.. इम्फाळ खोऱ्यात वर्चस्व असलेल्या बिगर आदिवासी मेईतींना अनुसूचित जमाती च्या मागणीच्या निषेधार्थ चुराचंदपूर जिल्ह्यातील टोरबुंग भागात ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर (एटीएसयूएम) ने पुकारलेल्या आदिवासी एकता मार्च दरम्यान बुधवारी हिंसाचार झाला.या रॅलीत हजारो आंदोलक सहभागी झाले, त्यादरम्यान त्यांच्यात हाणामारी झाली. आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेला हा हिंसाचार पुढे जिल्ह्यांमध्ये पसरला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे