गोल पोस्ट गुन्हा मनीष सिसोदियांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मनीष सिसोदियांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली, ३ जुलै २०२३ : आपचे नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळला. मदय घोटाळा प्रकरणी सिसोदियांना अटक करण्यात आली होती. दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी हे मदयधोरण लागू केले, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर २०२२ च्या शेवटी ते मागे घेण्यात आले होते.

न्यायमूर्ती दिनेश कुमार यांनी मनिष सिसोदिया यांच्या व्यतिरिक्त, उदयोगपती अभिषेक बोईनापल्ली, मदय कंपनीचे व्यवस्थापक मेसर्स पेर्नोड रिचर्ड बेनॉय बाबू आणि आप चे माजी संपर्क प्रभारी विजय नायर यांच्या याचिकाही फेटाळल्या. सिसोदिया यांनी पत्नीच्या बिघडलेल्या प्रकृतीसह विविध कारणांवर जामीन मागीतला होता.

ईडीने सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. जामीन फेटाळण्यात आलेले सर्वांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू होती. सिसोदिया यांना या घोटाळ्यातील कथित भुमिकेसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी प्रथम अटक केली होती आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version