चेन्नई: रविवारी एका काचेच्या लेप केलेल्या मांजाच्या धाग्याने गला कापून चेन्नईत तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. चेन्नईमध्ये ‘मांजा’ धाग्यांच्या वापरावर बंदी असूनही, रविवारी एका काचेच्या लेप धाग्याने गळा चीरल्यामुळे तीन वर्षाच्या मुलाचा जीव गेला. मुल कोरुक्कुपेट येथे दुचाकीवर आपल्या वडिलांसोबत जात होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.
रविवारी संध्याकाळी कोरूक्कुपेटचा गोपाळ अभिनयूसह टॉन्डीआर्पेटमधील नातेवाईकाच्या घरी परत जात होता, त्यावेळी लंप्पपोस्टवर लटकलेल्या एक मांजाचा धागा मुलाच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. मुलगा जखमेच्या वेदनेमुळे मोठ्याने रडू लागला त्यामुळे त्याच्या वडिलांनी गाडी थांबवली व नक्की काय झाले याचा अंदाज घेतला. त्याला तातडीने स्टॅन्लेच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
मुलाला इस्पितळात पोहोचल्यानंतर काही मिनिटांतच दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवून छापेमारी करणारे आर के नगर पोलिस धाग्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.