बीड २५ फेब्रुवारी २०२५ : संतोष देशमुखांची हत्या होऊन तीन महीने झाले आहेत. तरी अजूनपर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडलेले नाही, जे त्यांचे ९ जण मारेकरी आहेत, ते स्वत;हून हजर झाले आहेत. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर खोचक आणि गंभीर टीका केली आहे. जरांगे सध्या मस्साजोग येथे अन्नत्यागाच्या आंदोलनाला बसले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
संवाद साधतान मनोज जरांगे म्हणाले की, ” ही वेळ यायला नको होती. पण आता जी वेळ नको यायला पाहिजे होती, ती आलेली आहे. गावाला आज न्याय मागवा लागतोय आणि सत्ताधारी पक्ष फक्त तपास सुरू आहे इतकच सांगतात.” पुढे ते म्हणाले, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बघितल, तर आहे टेक आरोप आहेत.संपूर्ण राज्याला दिसत आहे. नाव सांगितली जातात, पुरावे दिले जातात, पण त्यानंतर पुढे प्रक्रिया का होत नाही, तेच मला काळत नाहीये. कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आहे, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली आहे. यासाठी प्रत्येकवेळी आंदोलन कारव लागत. मग, सरकारने गेल्या तीन महिन्यापासून काय केले ? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर