मनोरंजन विश्वात ‘स्वरंग’ चे पदार्पण

स्वरंग ही मराठी वाहिनी लवकरच मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. वाहिनीच्या नावाप्रमाणेच वाहिनी मध्ये सर्व प्रकारच्या मनोरंजनाच्या छटा असणार आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही वाहिनी असणार आहे. यामध्ये मनोरंजन, खाद्य, पर्यटन, संगीत, मालिका यांसारख्या सर्व प्रकारचे मनोरंजन या वाहिनीमध्ये असणार आहे. विशेषतः तरुणाईसाठी ही वाहिनी विशेष आकर्षण असणार आहे. म्हणून या वाहिनीला साजेसे असे नाव देण्यात आले आहे ‘स्वरंग’.
सध्या टेलिव्हिजनवर उपलब्ध असणाऱ्या मराठी वाहिन्या पैकी जवळजवळ सर्वच वाहिन्यांमध्ये सिरियल्सचा अतिरेक झालेला दिसतो त्यामुळे मनोरंजनाला फारसा वाव राहत नाही परंतु या वाहिनीमध्ये सर्व प्रकारच्या मनोरंजना मध्ये समतोल राखला आहे. दर्शकांसाठी ही वाहिनी पूर्ण मनोरंजन प्रदान करणारी एक वेगळी वाहिनी ठरणार आहे.
या नवीन पदार्पणा निमित्त वाहिनीने ‘सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. येथे आपण यवतेश्वरच्या ऐतिहासिक व निसर्गरम्य मार्गाने धावू शकता. उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट मार्ग समर्थन, रीफ्रेश मनोरंजन आणि आनंदी निरोगी वातावरणाचा आपण येथे अनुभव घेऊ शकतो. या रेस मध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर, आणि ३ किलोमीटर अशा कॅटेगरीज बनवल्या आहेत. सहभाग घेणाऱ्यांना वेगवेगळी बक्षिसेही ठेवण्यात आली आहे. हि रेस १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदवण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://www.skhhm.com या संकेतस्थळी रजिस्टर करा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा