नवी दिल्ली, दि. ९ जून २०२०: चालू आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत १,०१,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आतापर्यंतची ही सर्वात जास्त निधीची तरतूद आहे.
सन २०२०-२०२१ मध्ये ३१,४९३ कोटी रुपये यापूर्वीच जारी केले आहेत, जे चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतूदीपेक्षा ५०% नी जास्त आहेत.
आतापर्यंत एकूण ६०.८० कोटी श्रम दिवस झाले आहेत आणि ६.६९ कोटी लोकांना काम पुरवण्यात आले आहे. मे २०२० मध्ये दररोज काम करणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या २.५१ कोटी आहे, जी गेल्या वर्षी मे महिन्यात देण्यात आलेल्या कामांपेक्षा ७३% नी जास्त आहे, गेल्या वर्षी दररोज १.४५ कोटी लोकांना काम देण्यात आले होते.
चालू आर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये आतापर्यंत एकूण १० लाख कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारण आणि सिंचन, वृक्षारोपण, फलोत्पादन आणि वैयक्तिक लाभार्थी यांच्या उपजीविकेसंदर्भातील कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी