मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२: या ऐंशी वर्षात मी खूप शिकलो, भोगलं आणि खूप काम केलं. मला खूप काम करायचं आहे आणि शिकत रहायचं आहे, असं नुकतंच महानायक अर्थात बिग बी अर्थातच ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्याला निमित्त होतं अमिताभ बच्चन यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचं…
खरं तर विशेषणं अनेक, नाव एक, भूमिका अनेक पण नाव एक, आणि भावना अनेक पण नाव एकच… अमिताभ बच्चन… द ग्रेट अमिताभ बच्चन.. शिस्त, कामाप्रती प्रामाणिकता याच्या जीवावर आज हा ध्रुवतारा अभिनय शिखराववर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सिनेमांच्या हिट, फ्लॉप अनेक अनेक चित्रपटांवर टाकलेला हा प्रकाशझोत…
अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत १२७ चित्रपट केले. त्यातल्या हिट आणि सुपरहिट आणि सेमी हिट चित्रपटांची यादी आधी पाहूयात… बडे मिया-छोटे मिया, पिंक, पिकू, सरकार, बंटी और बबली, बागबान, कभी खुशी कभी गम, मर्द, आखरी रास्ता, शेहनशहा, कुली, नमक हलाल, सत्ते पे सत्ता, लावारिस, नसीब, राम बलराम, दोस्ताना, सुहाग, मिस्टर नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, डॉन, कस्मे वादे, परवरीश, अमर-अकबर-ऐंथनी, अदालत, हेरा-फेरी, शोले, चुपके-चुपके, दिवार, मजबूर, रोटी कपडा मकान, नमक हराम, सौदागर, जंजीर, बॉम्बे-टू गोवा, आनंद या चित्रपटांनी अमिताभ यांना ओळख दिली. यातील भूमिका नावीन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण होत्या, हे वास्तव सगळ्यांनी स्वीकारलं.
पण काही भूमिका वेगळ्या असूनही चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाले. फ्लॉप चित्रपटांची यादी… बेनाम, जमीर, इमान-धरम, द ग्रेट गॅम्बलर, दो और दो पाँच, अग्निपथ, मृत्यूदाता, लाल बादशाह, सुर्यवंशम, कोहराम, अक्स, काँटे, हम किसीसे कम नहीं, बूम, अरमान, ऐतबार, रुद्रांश, देव, क्यूं …हो गया ना…, हम क्यूं नही, अब तुम्हारे हवाले वतन साथियो… विरुध, एक अजनबी, फॅमिली-टाईज बॉन्ड, डरना जरुरी है, बाबुल, एकलव्य, नि:शब्द, राम गोपाल वर्मा की आग, सरकार राज, गॉड तुसी ग्रेट हो, द लास्ट इअर, अल्लाटिन, रण, तीन पत्ती, आरक्षण, डिपार्टमेंट, सत्याग्रह, महाभारत, शमिताभ, वजीर, सरकार-३, ठग्ज ऑफ हिंदुस्थान, चेहरे आणि झुंड अशा चित्रपटाचा समावेश आहे.
तर काही चित्रपटांनी साधारण व्यवसाय केले. या चित्रपटांची यादी… अभिमान, गंगा की सौंगंद, काला पत्थर, शान, बरसात की एक रात, याराना, कालीयाँ, शक्ती, देशप्रेमी, नास्तिक, हम, खुदा गवाह, हिंदुस्तान की कसम, एक रिश्ता- बॉन्ड ऑफ लव्ह, आँखे, खाँकी, दिवार- लेट्स ब्रिंग्ज अवर हिरो होम, ब्लॅक, वक्त, शूटआऊट एट लोखंडवाला, चीनी कम, भूतनाथ, भूतनाथ रिटन्स, १०२ नॉट आऊट, या चित्रपटांचा समावेश आहे.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ऐंशी वर्षाच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी जे चित्रपट केले, त्यानुसार त्यांनी अभिनयाचे एक विद्यापिठच निर्माण केले आहे. चढ-उतार, खाच खळगे आणि यशस्विता यांचा उत्तम मेळ साधत आज जगभरात अमिताभ बच्चन यांनी स्वत:चे अढळस्थान निर्माण केले आहे. अशा चतुरस्त्र कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… जीवेत शऱद: शतम्.. सर
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस