भोकरदन शहरात मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको

भोकरदन, २४ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओबीसीमधुन आरक्षण मागणी करिता आज सकाळी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्तारोको आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मनोज पाटील जरांगे आप आगे बढ़ो हाम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करून निषेध करण्यात आला.

जालना-जळगाव, भोकरदन-जाफराबाद, भोकरदन-सिल्लोड या मुख्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्तारोको केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना काही काळ अडथळा निर्माण झाल्याने वाहनाच्या चारी बाजूने रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळले. दरम्यान, रुग्णवाहिका, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, वयोवृद्ध यांना अडथळा निर्माण होवू नये म्हणून मराठा बांधवांनी येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. गणपत दराडे, स. पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संबंधित शासनच्या अधिकारी यांना मराठा समाज बांधवांच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी सुरेश तळेकर, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, त्र्यंबक पाबले, विष्णु गाढे, रामचंद्र गायके, बोरशे गुरुजी, गीताताई गावंडे यांच्यासह भोकरदन तालुक्यातील मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा