मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आदेशाने जालन्यात रस्ता रोको आंदोलनाची जोरदार तयारी

जालना २२ फेब्रुवारी २०२३ : २४ फेब्रुवारी पासून राज्यात गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहेत. मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे या रस्ता रोको आंदोलनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आलीय. गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी मराठा आंदोलन निवेदने सादर करतांना दिसून येतायत.

आज मराठा आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, जालना तहसीलदार छाया पवार यांच्या सह तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवदने देऊन २४ तारखेपासून रस्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी मागितलीय. एकुण काय तर मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा