मराठी अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांचे अमेरिकेत कर्करोगाने निधन

मुंबई, दि.११मे २०२०: हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार (वय ४२) याचे आज (सोमवारी) अमेरिकेमध्ये सकाळी ७.३० च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. साईप्रसाद हा मूळचा नागपूरचा असल्याने तो मराठी कलाकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. साईप्रसाद गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होता.

साईप्रसाद दोन वर्षांपासून ‘ग्लायोब्लास्टोमा’शी (ब्रेन कॅन्सर) झुंज देत होता, अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली.

साईप्रसादने ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारलेली आहे. अतिशय कमी वयात साईप्रसादचे निधन झाल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा