मराठी कलाकारांचा प्रति दिन रोजगारावरुन मारामार

पुणे, १७ सप्टेंबर २०२२ : कलाकारांचं आयुष्य हे अभिनयाच्या कारकिर्दीवर अवलंबून असते. पण सध्या या कलाकारांच्या प्रतिदिनाच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोविड नंतर कलाकारांनी निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार पर डे मानधन मान्य केलं. पण नंतर मात्र हे गणित गडबडलं आहे. नवीन कलाकार आहे त्या मानधनात काम करण्यास तयार होतात. त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवीन कलाकार आहे त्या मानधनात काम करण्यास तयार झाल्याने ज्येष्ठ कलाकारांच्या कारकिर्दीकडे, त्यांच्या अनुभवाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांना कायम दुर्लक्ष करुन काम काढून घेतले जाते. यामुळे अनेक कलाकार बेरोजगार आणि बेकार झाले आहेत. त्यामुळे आता जगायचं कसं असे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे धाकटे बंधू मुंकूद गोसावी यांनी सांगितले की, ज्येष्ठ कलाकारांची सध्या गरज आहे. मात्र नवीन कलाकारांमुळे योग्य मानधन मिळत नाही. प्रवास खर्च किंवा इतर शुल्क वाढल्यामुळे जास्त मानधन मिळण्याची आमची अपेक्षा असते.

पण नवीन कलाकारांच्या तडजोडीमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे आमच्या अभिनयाच्या अनुभवाचा विचार निर्मात्यांनी करावा, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

ही तर एका कलाकाराची व्यथा आहे. पण अशा अनेक व्यथा कलाकारांच्या आहे, ज्याकडे निर्मात्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा