पुणे; मराठी चित्रपट रसिकांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत
शुक्रवार 24 ऑक्टोबरला ‘हिरकणी’ तर 25 ऑक्टोबरला ‘ट्रिपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. दरम्यान, याच आठवड्यात ‘हाऊसफुल 4’, ‘सांड की आँख’ आणि ‘मेड इन चाइना’ हे तीन मोठे हिंदी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही स्क्रीन्स मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने खळखट्याकचा इशारा दिला आहे.
‘मराठी चित्रपटांना शो मिळण्यास अडचणी येऊ नयेत. कारण त्यांना हे नुकसान परवडण्यासारखे नाहीचित्रपटांना योग्य वेळेचे शो मिळावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.
ही मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करावं लागेल आणि त्याची जबाबदारी थिएटर चालकांची असेल, अशा इशारासुद्धा मनसेनं यावेळी दिला आहे.
उद्या प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट “ट्रिपल सीट” व “हिरकणी” यांना हिंदी चित्रपट “हाऊसफुल” यामुळे चित्रपटगृह व शो न मिळण्याच्या निषेधार्थ आज मनसे चित्रपट सेनेच्या वतीने शहरातील सर्व चित्रपटगृह चालक मालक यांना निवेदन देण्यात आले व यावर त्वरित कृती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.