मराठी सिनेमा ‘बोनस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

19

मुंबई : दिगदर्शक सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.
सिनेमात अभिनेता घश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे हि जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. “सिनेमाच्या नावावरून हा सिनेमाची कथा धैर्य आणि धाडसाची तसेच धुंडाळलेल्या वेगळ्या पायवाटेची आहे अशी जाणवते. येत्या २फेब्रुवारीला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा