‘फुलवंती’आणि ‘पाणी ‘ या दोन चित्रपटांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स वर कोरल आपल नाव…

Phullwanti and Paani Shine at Filmfare Marathi Awards 2025

Phullwanti and Paani Shine at Filmfare Marathi Awards 2025: ज्या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमा क्षेत्रातील कलाकारांचा उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. तो पुरस्कार सोहळा म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ यंदाचा फिल्मफेअर हा नुकताच मुंबईतील सहारा हॉटेल येथे पार पडला.

या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर व अमेय वाघ यांनी केलं. आणि मुख्य म्हणजे यंदा या सोहळ्याला मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार देखील उपस्थित होते.फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या संध्याकाळी उत्कृष्ट संगीताला आदरांजली वाहताना संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन्मान स्वीकारताना त्या म्हणाल्या, हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. तसेच आज पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना हा सन्मान प्रदान करणारे सचिन पिळगावकर यांनी गंमतीने विचारलं की, “त्यांनी आपली फक्त गायनाची प्रतिभाच का जगासमोर आणली आणि आपली दुसरी प्रतिभा ‘चित्रकला’ का लपवून ठेवली? यावर उषा मंगेशकर म्हणाल्या की, त्या पेंटिंग्ज फक्त त्यांच्यासाठीच होत्या आणि नंतर त्यांनी त्या पेंटिंग्जमधून स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी एक पुस्तकही तयार केलं होतं.

आणि त्याचबरोबर फुलवंती’ हा चित्रपट सात प्रमुख पुरस्कारांसह या सोहळ्यातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्याच्या पाठोपाठ ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर