मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न काहीतरी करुन दाखविण्याचे असते. ते करण्यासाठी घेतलेली मेहनत त्याला पुर्ण करते.असेच कलाकार म्हणजे विक्रांत शिंदे आणि प्रशांत जाधव.दोघेही या चित्रपट सृष्टी मधे १४ फेब्रुवारीला येणाऱ्या सोलापूर गैंगवार या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.दोन्ही कलाकार यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.तसे विक्रांत शिंदे यांनी अनेक नाटकातून आपल्या कलागुणांनी रसिकांना भुरळ पाडली तर त्यात हवे पंख नवे,तथास्तु,एन्जॉय,नाग पद्म,बुद्रुक वैतागवाडी, स्पिरीट या अश्या अनेक नाटकातून वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या तसेच छोट्या पडद्यावर जय मल्हार व तु माझा सांगाती या मालिकेत काम केले आहे.मोठ्या पडद्यावर हा त्यांचा पहिला चित्रपट आसला.तरी मराठीत येणाऱ्या पानिपत या चित्रपटात ही त्यांची मुख्य भूमिका लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रशांत जाधव हे एक प्रामाणिक होतकरू कलाकार आहेत.या आधी रंगभूमीवर बरीच नाटके गाजविली तर आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी रसिकांच्या मनात घर केले.तसेच झझांवात या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे.जो सोलापूर गैंगवार या चित्रपटानंतर प्रदर्शित होणार आहे.तसे प्रशांत जाधव हे पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी आपल्या अभिनयाची कला जशीच्या तशी जोपासली आहे.
मराठी चित्रपट सृष्टित ठसा उमटवू पाहणारे हे दोन्ही कलाकार जीवाभावाचे मित्र देखील आहेत तर कलेच्या बाबतीत जेव्हढे प्रामाणिक,वयक्तिक जीवनात ही तेव्हढेच कर्तुत्ववान आहेत.