महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ २२ हजार झाडे लावतोय हा उपक्रम 

इंदापूर, १२ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाने जो २२००० हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे, हा उपक्रम अतिशय स्तुत्य व चांगला आहे. असे गौरवोद्गार बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदाताई पवार यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते ‘२२ हजार वृक्ष लागवड’ संकल्पाचा प्रारंभ सोमवार ( दि. १२ ऑक्टोबर ) रोजी करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने उपस्थित होते. यावेळी सुनंदाताई पवार बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे तसेच राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या वतीने इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, मुख्य सचिव सागर शिंदे,उपाध्यक्ष संदीप सुतार, जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी, तालुका संघटक भिमराव आरडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे रामदास पवार, दत्तात्रय गवळी, गोकुळ टांकसाळे, सचिन खुरंगे, उदय देशमुख, निखिल कणसे व प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले, स्वप्नील चव्हाण, त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास घनवट, सरपंच मोनाली दळवी, उपसरपंच सुनील शिंदे, ग्रामसेवक बालाजी निलेवाड, पोलीस पाटील रेश्मा गुणवरे, मुख्याध्यापक बालाजी कलवले, गावकरी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गुणवरे, सामजिक कार्यकर्ते विनोद दळवी, नंदकुमार भोसले, सुखदेव गुणवरे, दिलीप गुणवरे, अंगणवाडी शिक्षिका उषा सुतार, आशाताई शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी शाळेमध्ये कोरोना मुक्ती संदर्भात गुढी उभारून महिलांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, गावोगावी वृक्षारोपण करून त्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कुटुंबासमवेत पत्रकार संघाने घेतली असून 22000 फळझाडे लावली जाणार आहेत. कोविड कालावधीत जी गरीब कुटुंबांना नागरिकांना गरज होती. ती गरज ओळखून 13 हजार कुटुंबांना पत्रकार संघाच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप झाले आहे. त्यामुळे गोरगरिबांची सेवा या पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेली दिसते. मात्र वृक्षारोपण करताना, झाड कायमस्वरूपी जगले पाहिजे ते व्यवस्थित वाढले पाहिजे, यासाठी प्लांटेशन व ज्या कुटुंबांना ही झाडे दिली जातील. त्या कुटुंबांना प्लांटेशन संदर्भातील गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. मगच दिलेल्या झाडांना फळे यायला वेळ लागणार नाही अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

राज्य सरकार व केंद्र सरकारने कित्येक वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून देखील गावे स्वच्छ ठेवा, हात स्वच्छ ठेवा, शौचालय स्वच्छ ठेवा, या संकल्पना लोकांसमोर आणल्या. परंतु कित्येक नागरिकांनी या संकल्पनेचा स्वीकार केला नाही. परंतु कोविडने सर्वच जनतेला गुडघे टेकायला लावले तोंडाला फडके बांधायला लागली, सॅनिटायझर हाताला वापरायला लावले, हाताची स्वच्छता कशी करायची हे शिकवले, त्यामुळे महाभारीने लोकांना अक्कल शिकवली आहे. असे असले तरी कोरोना कधी जाणार हे कोणालाही स्पष्ट सांगता येत नाही. त्यामुळे कोरोनाला घेऊन जगायचे आहे. घरातला किचनचा कट्टा एक दिवस स्वच्छ करायचा राहिला तरी चालेल, मात्र आपले स्वच्छालय लखलखीत निर्मळ असले पाहिजे. घर स्वच्छ असेल तरच आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळेल व ते इतर लोकांना देखील स्वच्छ राहतील. त्यामुळे मुलांना संस्कार शिकवा जे पेराल तेच उगवते त्यामुळे अगोती गावाने आगामी काळात स्वच्छतेसंदर्भात उत्कृष्ट काम करावे असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले, तर सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले व आभार सिनेमा अभिनेते शिवकुमार गुणवरे यांनी मानले.

नवदुर्गाचा जागर करताना स्वच्छतेचा जागर करा:

आपल्या घरात वर्षानुवर्ष वापरलेल्या गोधड्या व पडून असलेली भांडी,आपण 365 दिवस चकाचक ठेवली पाहिजे. उगीच नवरात्र उत्सवात धुणीभांडी धूत महिलांनी स्वतःला त्रास करू नये. 365 दिवस आपले घर आरशासारखे स्वच्छ ठेवा. निर्मळ ठेवा यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे. मंदिराकडे न जाता या नवदुर्गाचा जागर करताना स्वच्छतेचा जागर महिलांनी करावा. जेथे गृहिणीचा हात फिरतो तेथे लक्ष्मीचा वास असतो. व जेथे घरासमोर कचरा असतो, घाण असते तेथे अवदसेचे राज्य असते. त्यामुळे स्वच्छतेचा जागर करा असे आवाहन उपस्थित महिलांना सुनंदाताई पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी होस्टेल काढावीत:

सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून बारामती येथे अध्यावत मुलींना शिक्षणासाठी होस्टेल व शैक्षणिक सुविधा कित्येक वर्षापासून उपलब्ध आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व मुलींना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. मात्र वाढती लोकसंख्या मुलींचा शिक्षणातील गुणात्मक दर्जा यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये अध्यावत मुलींच्या शिक्षणासाठी होस्टेल बारामतीच्या धर्तीवर काढले जावे. अशी अपेक्षा पुणे जिल्हा परिषदेचे माझी बांधकाम सभापती प्रवीण भैय्या माने यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा