मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ थंडावली; शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

8

नांदेड, १ जानेवारी २०२३ : मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे (वय १०२) यांचे निधन झाले. धोंडगे यांच्यावर औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केशवराव धोंडगे हे प्रदीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी विधानसभेबरोबरच लोकसभेतही जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे.

केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते; तसेच एक वेळा ते लोकसभेची निवडणूकही जिंकले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ते सभागृहात पोटतिडकीने मांडत असत. विधानसभेत त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. ते निर्भीड आणि स्वाभिमानी बाण्याचे जनप्रतिनिधी होते.

आणीबाणीच्या लढ्यात होते अग्रेसर
केशवराव धोंडगे यांनी आणीबाणीच्या लढ्याचेही नेतृत्व केले होते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ते १४ महिने कारावासात होते. यातून महाराष्ट्राचा त्यांचा लढाऊ आणि स्वाभिमानी बाणा दिसला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा