मराठ्यांच्या भरभराटीचा आणि अस्ताचा साक्षीदार ‘शनिवारवाडा’

मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेल्या शनिवारवाड्याचे आजच्याच दिवशी पायाभरणीचे काम सुरु झाले होते. शनिवार वाड्याची मुहूर्तमेढ थोरले बाजीराव पेशवे यांनी रोवली. १० जानेवारी १७३० रोजी शनिवारी रोवण्यात आल्याने त्याला शनिवारवाडा असे नाव पडले. २२ जानेवारी १७३२ ला शनिवारवाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती.

१८२८ रोजी या वाड्याला आग लागली. यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी जेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये आदी सुरू केले होते. यानंतर १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले.
शनिवारवाड्याचा आकार चौकोनी आहे. ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे. तटबंदीची उंची ३३ ते ३४ फुट आहे. वाड्याच्या इमारतीची उंची २१ फूट आहे. चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत आहे. वाड्याभोवतालच्या भिंतीला ५ मोठे दरवाजे आहेत.तटाला ९ बुरूज आणि तोफा बसवण्याची सोय आहे. तटावर जाण्यासाठी एकूण ९ जिने आहेत.
वाड्यातील दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट तर रुंदी १४ फूट आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० नोकर कामाला होते.
भगवी झेंडा ते युनियन जॅक फडकताना या वाड्याने अनुभवलेला आहे. आपल्या अनेक कटू व काही सुखद आठवणी घेऊन हा वाडा आजही उभा आहे.
सध्या शनिवारवाड्यात पाहण्यासारखी काहीसेच अवशेष उरलेले आहेत. इ.स.१८२८ साली लागलेल्या आगीत हा ७ मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे वाड्याच्या स्वरूपात आज फार बदल झालेला आहे.

शनिवार वाड्यात असलेले दरवाजे :
◆ दिल्ली दरवाजा
◆ मस्तानी दरवाजा
◆ खिडकी दरवाजा
◆ गणेश दरवाजा
◆दक्षिण दरवाजा

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा