आजपासून मार्गशीर्ष हा महिना सुरू होत आहे. या महिन्यात महिला वर्ग दर गुरुवारी उपवास धरून देवीचे व्रत करतात. हे व्रत करताना धर्म शास्त्रानुसार सुख-सौभाग्यात वृद्धीसाठी आपल्या घरात शंख स्थापित करावे. तसेच अगहन (मार्गशीर्ष) महिन्यात शंख पूजन करण्याचं विशेष महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकाराच्या शंखाला प्रभू श्रीकृष्णाचे पंचजन्य शंख मानून पूजन केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
विष्णू पुराणानुसार समुद्र मंथन दरम्यान प्राप्त झालेल्या १४ रत्नांपैकी एक रत्न होतं शंख. दररोज घरात शंख पूजन केल्याने जीवनात कधीही धन-धान्य, आणि पैशांची कमी भासत नाही.
या व्यतिरिक्त दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. या शंखाची पूजा केल्याशिवाय लक्ष्मी आराधना अपुरी मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यात विशेष करून लक्ष्मी पूजन करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा अवश्य करावी.
शंख पूजन सामुग्री :
* शंख
* कुंकू
* अक्षता
* जल पात्र
* कच्चं दूध
* एक स्वच्छ कपडा
* एक तांब्याच्या किंवा चांदीचा लोटा
* पांढरे फुलं
* अत्तर
* कापूर
* केशर
* उदबत्ती
* दिवा लावण्यासाठी शुद्ध तूप
* नैवेद्य
* चांदीचं वर्क
या प्रकारे करा पूजा-
सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ धुतलेले वस्त्र धारण करावे.