गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा विवाहितेचा छळ, सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ, सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती, २ ऑक्टोबर २०२०: माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ करत तिला मारहाण करत तिच्या अंगावर राॅकेल ओतल्याप्रकरणी सिद्धेश्वर निंबोडी येथील तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिनी शिवाजी लांडगे यांनी याबाबत फिर्याद दिली. पती शिवाजी उत्तम लांडगे, सासरे उत्तम लक्ष्मण लांडगे व सासू मालन उत्तम लांडगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते १ ऑक्टोबरपर्यंत ही घटना घडली. दि. १ रोजी फिर्यादी या घरात काम करत असताना सासरे उत्तम यांनी काहीही कारण नसताना शिविगाळ करत हाताने धक्काबुक्की करत मारहाण केली. पतीने तेथे येत तुला इथे राहायचे असेल तर तुझ्या भावांकडून दोन लाख रुपये घेवून ये, मी दुसऱ्या लोकांकडून ऊसने पैसे घेतले असून त्यांना द्यायचे आहेत, अशी मागणी केली. मी पैसे आणणार नाही, असे फिर्यादी म्हणाल्या असता पतीने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

घरामध्ये असलेले राॅकेल अंगावर ओतले. त्यांच्या तावडीतून सुटका करत फिर्यादीने तक्रार दाखल केली. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपींकडून तु इथे राहायचे नाही, तु घटस्फोट दे अशी मागणी करत उपाशीपोटी ठेवत शारिरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version