नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याने बाजार कोसळले, क्रेटला ७०० ते १००० रुपये भाव

पुणे, ११ ऑगस्ट २०२३ : आजवर समाजात आपल्या व्यथा आणि वेदना सहन करत शेतकरी जीवन जगत आला आहे. नशिबावर हवाला ठेवत काबाडकष्ट करून शेती पिकवण्याचे काम एकनिष्ठेने करत आहे.तरीही देशातील शेतकऱ्यांसमोरची संकटे कधीच संपत नाही. नैसर्गिक आपत्तीतून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी येतो. त्यातूनही पिकवलेल्या शेतमालास भाव मिळत नाही. याबाबतीत टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार या अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा भाव मिळत नसल्यामुळे टॉमेटो रस्त्यावर फेकून द्यावे लागतात. यंदा टोमॅटो पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. टोमॅटोची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नारायणगावात यंदा कोट्यवधींची उलाढल झाली.

मात्र आता नारायणगाव बाजारात टोमॅटोचे भाव कोसळले आहे. बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढल्याने बाजार कोसळले आहे. यंदा जुलै महिन्यात टोमॅटोच्या क्रेटला सर्वाधिक ३५०० रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु काल गुरुवारी नारायणगाव बाजार समितीत नऊ हजार क्रेटची आवक वाढली. यामुळे वीस किलोच्या क्रेटला अकराशे रुपये बाजार भाव मिळाला आहे.

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १७ लाख ९९ हजार क्रेटची खरेदी, विक्री झाली आहे. यामाध्यमातून बाजार समितीमध्ये १०७ कोटींची उलाढाल झाली आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल टोमॅटो पिकातून केली.नारायणगाव शेतकऱ्यांचा फायदा झाला, त्या प्रमाणे येथील तरुणांना रोजगार मिळाला. दिल्ली, कर्नाटक, गुजरात ओडिशामधून अनेक व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आले.राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातूनही अनेक व्यापारी नारायणगावात आले. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला.

या वर्षी देशात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. यामुळे देशात टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळला. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोचे उत्पादन झाले. त्यामुळे यंदा टोमॅटोला आतापर्यंतचा सर्वाधिक ३५०० रूपये क्रेटला भाव मिळाला होता.परंतु आता बाजारात टोमॅटोची आवाक वाढल्यामुळे दर कमी होऊ लागले आहे. आता हा दर ७०० ते १००० रुपये भाव मिळत आहे.यामुळे ग्राहकांनासुध्दा आता लवकरच स्वस्त दारात टोमॅटो मिळणार आहे.मात्र,शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा