रत्नागिरी, १२ नोव्हेंबर २०२३ : यंदा दिवाळीनिमित्त रत्नागिरी शहरांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त शहरातील रामआळी येथील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील लोकांची खरेदीसाठी झुंबड झाल्याचे दिसून येत आहे. कोविड नंतर परगावातून विक्रेते आणि दिवाळीनिमित्तच्या विविध वस्तू विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र यंदा परगावातून मोठ्या प्रमाणात विविध रांगोळी व्यवसायिक पणती व्यावसायिक शहरात दाखल झाले आहे. आज खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड झाल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती.
शहर परिसरात फटाके खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून विविध प्रकारचे फॅन्सी तसेच प्रदूषण विहरित फटाके मोठ्या प्रमाणात विक्रीला आले आहे. इको फ्रेंडली फटाकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे फटाका व्यावसायिकांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर