मार्केट यार्डातील हमाल भवनात कामगार मेळाव्याचे आयोजन

पुणे: मार्केट यार्डातील हमाल भवनात रविवारी दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड हे ठिकाण अन्नधान्य व भाजीपाला यांचे केंद्र स्थान मानले जाते. पुणे किंवा मुंबईला आयात होणाऱ्या भाजीपाला किंवा अन्नधान्याचा साठा प्रथम येथे केला जातो.

याप्रसंगी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आय एल ओ चे कामगार प्रतिनिधी सुलतान अहमद उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिली. महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्या दरम्यान माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी, होता पेढ्यांची हप्ते बंदी, मा पाण्यांच्या नोकरीवरील टांगती तलवार, राज्य सल्लागार व जिल्हा मंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या याबाबत कामगार मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा