मुंबई, दि. २९ जून २०२०: राज्यात एकिकडे कोरोनाचा उद्रेक होत आहे. तर सर्वसामान्य जनतेला खासगी रुग्णालये लुटत आहेेत. असे खासगी आनेक रुग्णालये या कठीण परिस्थितीत लोकांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढे आले पण त्यातील बहुतांश रुग्णालय हे लोंकांची मोठया प्रमाणात लूट करत आसल्याची माहीती समोर येत आहेत.
कल्याण पुर्वेकडील एका खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आकरण्यात आलेल्या पीपीई किटचे तीन दिवसांचे २७ हाजार रुपये आकरण्यात आल्याने बिलाचा आकडा हा अव्वाचा सव्वा झाल्याचे दिसत आहे.
वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी स्थानिक नगर सेवकाकडे धाव घेतली आसता नगरसेवकाने थेट रुग्णालय गाठलं. तिथे जाऊन त्याने प्रशासनाला जाब विचारला आसता रुग्णालय प्रशासनाने आपली चूक कबूल करत पीपीई किटचे दर कमी केले.
पुढे या प्रकरणात असे लक्षात येते, की एकदा व्यक्ती मागे राजकीय व्यक्तीचा उभी असेल तर न्याय मिळतोय पण बाकी रुग्णांचे काय? कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची खुलेआम होणारी लूट प्रशासनाने थांबवावी असे त्रस्त नागरिक मागणी करत आहेत.
दरम्यान, नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोरोना काळात माणुसकी दाखवत रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ नका. अन्यथा परिणाम वाईट होतील आसा सज्जड दम दिला आहे.
पण एकीकडे कोरोना व्यतरिक्त रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय मिळत नाही आणि मिळाली तर अश्या खासगी रुग्णालयात बेछूट लूट केली जाते. या आधीही रुग्णांना दिड-दोन लाखाच्या बिल देखील दिले जात असल्याचे वृत्त येत आहेत. त्यामुळे यांच्या वर काहीतरी कार्यवाही केली पाहीजे असे त्रस्त नागरिक करत आहेत. तर राज्य प्रशासनाने यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी