दिवाळीसाठी ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या, ग्राहकांच्या ऑनलाइन खरेदीचा बाजारपेठेवर परिणाम

नांदगाव, नाशिक १० नोव्हेंबर २०२३ : हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी. गरीब असो वा श्रीमंत जो-तो आपल्या परीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. यंदाही दिवाळीसाठी ग्रामीण भागातील बाजारामध्ये मोठी गर्दी होताना दिसतेय. व्यापार्यांकडुन दिपावलीसाठी लागणारे आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, खाद्य पदार्थ, कपडे, पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने बाजारपेठेत लावण्यात आली आहेत. मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून ऑनलाइन खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याने याचा परिणाम बाजारपेठवर जाणवत आहे.

सध्याचे युग हे डिजिटल असल्याने याचे परिणाम बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीवरही जाणवत आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन वस्तू खरेदी करणे सोपे झाले आहे. सणानिमित्ताने सर्वच कंपन्या या ऑनलाइन खरेदीवर कमी किंमती सह आकर्षक सूट देत असतात, यामुळे साहजिकच नागरिक याकडे आकर्षित होऊन खरेदी करतांना दिसतात. परिणामी प्रत्येक शहरातील बाजारपेठेवर याचे परिमाण होऊन सर्व सामान्य ग्राहक कमी होत असल्याचे दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा