गोल पोस्ट गुन्हा मार्क वाढवतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी

मार्क वाढवतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी

अहमदनगर : इंटरनल मार्कांसाठी बारावीच्या विद्यार्थिनीकडे शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार आज श्रीरामपूरमध्ये समोर आला. याप्रकरणी पालकांनी पोलिसांकडे संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

बारावी बोर्डाची परीक्षा लवकरच होणार आहे. यातच बोर्डाच्या आतांरशालेय परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेचे गुण स्थानिक शिक्षकांच्या हाती असतात. हे गुण वाढवून देण्यासाठी श्रीरामपूरमधील बेलापूरच्या कॉलेजमधील एका शिक्षकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यावर याबाबत पालक खूपच आक्रमक झाले.
याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी पालकांनी केली. काही पालकांनी आंदोलन केले आहे. शिक्षकाने केलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मानसिक धक्का बसला असून समुपदेशनाची गरज व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version