गोल पोस्ट महाराष्ट्र चोपडा तालुक्यातील शहिद जवान विलास कोळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चोपडा तालुक्यातील शहिद जवान विलास कोळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव १ डिसेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यामधिल कुसुंबा गावातील जवान विलास कोळी, हे काल कोरापुट येथे देशसेवेत कार्यरत असताना शहिद झाले. विलास कोळी हे २०२ कोब्रा कंमाडो स्पेशल फोर्स मध्ये कार्यरत होते. त्यांना विरगती प्राप्त झाल्याचे वृत त्यांच्या मुळ गावी कुसुंबा येथे कळाल्यानंतर संपुर्ण तालुक्यात हि वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली.

आज दुपारी साडेबारा नंतर गलंगी गावापासून त्यांची अंतयात्रा निघाली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आमदार लता सोनवणे यांनी त्यांना पुष्प चक्र वाहिले. यावेळी शहिद जवान अमर रहे, भारत माता की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला. जवान विलास कोळी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातून, तालुक्यातून बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मुलाने पार्थिवाला अग्नी डाग दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version