गोल पोस्ट महाराष्ट्र केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मनमाडमधील खचलेल्या रेल्वे ब्रिजची केली पाहणी, उड्डाण...

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मनमाडमधील खचलेल्या रेल्वे ब्रिजची केली पाहणी, उड्डाण पुल आणि बायपाससाठी गडकरींची घेणार भेट

नाशिक १ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या मनमाडमध्ये कठडा खचलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करीत खचलेला कठडा तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

रेल्वेच्या ब्रिजचा कठडा खचल्याने शहर दोन भागात विभागले गेले तर पुणे – इंदूर महामार्गाची वाहतुकही वळविण्यात आल्याने नागरिक व वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या पुलाच्या इतर भागाचे स्ट्रक्चलर ऑडीट करून त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्याबरोबर नवीन उड्डाण पुल व बायपास रोडबाबत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी डॉ. भारती पवार यांनी दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version