मारवे बीचवर दोन अल्पवयीन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू

मुंबई, दि. २२ जून २०२० : मुंबईतील मार्वे किनाऱ्यावर दोन मुले समुद्रात बुडाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना अग्निशमन दलाला समजताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले.

या घटनेबद्दल अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालवणातील आझमी नगर भागातील सहा मुले रविवारी सायंकाळी ५.३० वाजता मारवे किनाऱ्यांवर फिरायला गेले होते. यानंतर ते समुद्रात गेले. या मुलांपैकी दोन मुले किनाऱ्यापासून जास्त आत मध्ये गेले असता लाटांनी त्यांना आत मध्ये ओढून घेतले. इतर चार मुलांनी काही स्थानिकांना याची माहिती दिली. दोन मुले वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी ताबडतोब पोलिसांना दिली.

पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि बचाव दलाने रात्री ८ च्या सुमारास १३ वर्षाच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. तरीही त्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह अजूनही ताब्यात आला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारामुळे रविवारी रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या मुलाचा मृतदेह शोधण्यामध्ये अडचणी येत होत्या. सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सोमवारी सकाळी १६ वर्षाच्या मुलाचा मृतदेह ही ताब्यात घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा