ठाकरे गटाला ‘मशाल’

8

मुंबई, ११ ऑक्टोंबर २०२२: महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या युद्धादरम्यान उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलंय. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या तीन पर्याय मागितले असून, त्या आधारे त्यांना निवडणूक चिन्हही दिले जाणार आहे.

एकनाथ शिंदे गटाचे नाव बदलून बाळासाहेबांची शिवसेना असे करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांचं निवडणूक चिन्ह अद्याप निश्चित झालेलं नाही. निवडणूक आयोगानं हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा निवडणूक चिन्हावरून वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोचलाय. सोमवारीच उद्धव ठाकरेंच्या वतीनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. त्या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला असून, तेथे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलंय.

एकनाथ शिंदे गटाच्या वतीने पहिले तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचीही माहिती मिळावी. परंतु निवडणूक आयोगाने त्या तीनपैकी दोन पर्याय नाकारले, तर तिसरा पर्याय द्रमुकच्या निवडणूक चिन्हाशी जुळत असल्याने स्वीकारला गेला नाही. शिंदे गटाकडून निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, गदा आणि उगवता सूर्य पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु निवडणूक आयोगानं त्रिशूल आणि गदा धार्मिक आणि उगवता सूर्य द्रमुकचे निवडणूक चिन्ह म्हणून संबोधलं. अशा स्थितीत आता पुन्हा शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय पाठवावे लागणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ मुद्दे वेगळे राहिले असले तरी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई तीव्र होत आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर सत्ताबदलाची सुरुवात झाली, मात्र त्यानंतर शिवसेनेचे वर्चस्व वाचवण्याच्या लढाईने तणाव कमी करण्याची संधी दिली नाही. आता या सगळ्यावर निवडणूक चिन्हाच्या लढतीनं वादात आणखी भर पडली आहे. सध्या तरी उद्धव आणि शिंदे या दोन्ही छावणीत ना शिवसेनेचे नाव आहे ना समान चिन्ह मिळालं आहे.

यापूर्वी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून उद्धव आणि शिंदे यांच्यात प्रदीर्घ कायदेशीर लढा झाला होता. पुढं उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित झाला, पण दोन्ही सभांना आलेल्या प्रचंड जनसमुदायाने पुन्हा दाव्यांचा फेरा सुरू केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा