गोल पोस्ट महाराष्ट्र खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात भीषण स्फोट

खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात भीषण स्फोट

खोपोली, १४ जुलै २०२० : खोपोली शहरात असणाऱ्या इंडिया स्टील या कारखान्यात आज मध्यरात्री भीषण स्फोट झाला. तर या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या २ कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे समजत आहे.

रात्रपाळी करत असलेल्या हे दोन कामगार एल पी जी सिलेंडर कटिंग करीत असताना हा स्फोट झाला असल्याचे पुढे येत आहे. ह्या घटने मध्ये मृत्यमुखी झालेल्या कामगारांचे नाव दिनेश चव्हाण (५५) आणि प्रमोद शर्मा (३०) असे आहेत. तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सुभाष वांजळे (५५) असे आहे.

कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. परंतू कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा मुळे हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version