गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ : एका मोठ्या वृत्तानुसार मुंबईतील कुरेशी नगर येथील कुर्ला पूर्व भागातील एका झोपडपट्टीत भीषण आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले आहे. आग सध्या नियंत्रणात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला येथे आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी एका निवासी इमारतीला आग लागली, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगर भागात असलेल्या गॅलेक्सी इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये, शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी पहाटे ५.२० वाजता आग लागली.स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि सकाळी ७:१५ च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version