गोल पोस्ट इतर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी विभागात मोठी आग

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी विभागात मोठी आग

दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ : दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी विभागात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले असुन घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एंडोस्कोपी कक्षात आग लागली आहे. सर्वांना वार्डातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. एम्स रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. एम्सचे संचालकही घटनास्थळी पोहोचले आहेत.

एम्सच्या सुत्रांनी सांगितले की, जुन्या ओपीडीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एंडोस्कोपी रुममध्ये आग लागली. आग लागल्यानंतर लगेचच रुग्णांना खोलीतून बाहेर काढण्यात आले आहे. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version