नाशिकच्या नांदगाव शहरात भव्य रोजगार मेळावा संपन्न

नांदगाव, नाशिक २५ फेब्रुवारी २०२४ : नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून तरुण-तरुणींना रोजगार मिळावा या हेतूने शहरातील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे आज भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज सन्स, हिताची जळगाव, रिंग प्लस एक्वा, लुपिन फार्मासुटिकल, व्हीआयपी टपारिया, टूल्स गॅब्रियल ग्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींसह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी मतदार संघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली. या झालेल्या रोजगार मेळाव्यात मतदारसंघातील ८२३ तरुण-तरुणींनी नोकरी करीता मुलाखत दिली. यामध्ये ४१७ जणांना तात्काळ नोकरीचे लेटर देण्यात आले. तसेच काहींना पुढील इंटरव्यू साठी नाशिक येथे बोलावण्यात आलेले आहे, या मध्ये दहावी बारावी पास नापास आयटीआय डिप्लोमा डिग्री तसेच फार्मासिटिकल व सिविल इंजिनियर यांचा समावेश होता.

मतदारसंघातील हा सातवा मेळावा आहे आणि तालुक्याच्या विकासाबरोबरच तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमी विचार करून कार्य करत असल्याचे अंजुम कांदे यांनी सांगितले आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी देवरे सरचिटणीस महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांनी मेहनत घेतली.

या मेळाव्या प्रसंगी नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेशजी कवडे, माजी सभापती विलास आहेर, किरण अण्णा कांदे, ज्ञानेश्वर कांदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे, भैय्यासाहेब पगार, संजय आहेर, नंदू पाटील, गुलाब भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, राजाभाऊ देशमुख, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी भाऊराव बागुल, शशिकांत सोनवणे, रमेश काकळीज, बापू जाधव, उमेश मोरे, निशांत बोडके, आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्या जगताप, संगीता बागुल, पूजा छाजेड, रोहिणी मोरे, तबासून शेख, संगीता सांगळे भारती बागोरे, सोनिया सोर, निशा चव्हाण, जयश्री डोळे, आदींसह शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा