उज्जैन, दि. ९ जुलै २०२० : कानपूर गोळीबारातील मोस्ट वॉन्टेड विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे की विकास दुबे यानी महाकालेश्वर मंदिराची वर्गणी पावती केली आणि त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले आहे. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विकास दुबे याच्या अटकेची माहिती यूपी पोलिसांनी दिली आहे.
असे सांगितले जात आहे की विकास दुबे याने आत्मसमर्पण केल्याबद्दल स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती. यानंतर उज्जैनच्या महाकाळ पोलिस ठाण्याजवळ त्याने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी विकास दुबे याला अटक केली असून त्याला महाकाल पोलिस ठाण्यात आणले आहे. आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनंतर एसटीएफची टीम उज्जैनला रवाना झाली आहे.
मंदिराबाहेर ओरडला… ‘मैं विकास दुबे , कानपूरवाला’
विकास दुबे महाकाल मंदिरासमोर उभा असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक मीडिया तेथे पोहचताच तो ओरडला की मी विकास दुबे आहे. यानंतर स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्याला तातडीने अटक करण्यात आली आणि थेट महाकाल पोलिस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्याची चौकशी केली जात आहे.
गृहमंत्र्यांनी अटकेसंदर्भात विधान करणे टाळले
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, सध्या विकास दुबे मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. अटक कशी झाली? याबद्दल काही बोलणे योग्य नाही. त्याला मंदिराच्या आतून किंवा बाहेरुन अटक केली याबद्दल सध्यातरी सांगणे शक्य नाही. त्याने सुरुवातीपासूनच क्रौर्याची मर्यादा ओलांडली होती. घटनेबाबत आम्ही पोलिसांना सतर्क ठेवले होते, असे म. प्र.चे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले
न्यूज अनकट प्रतिनिधी