लागणारे साहित्य: मटार अर्धा किलो, सोललेले दाणे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा चाट मसाला, मिरेपूड अर्ध्या, लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर, मीठ, हिरवी मिरची, लसुन, आद्रक, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, एक चमचा धणा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद अर्धा चमचा, बेसन पीठ ,
पारीसाठी मैदा, तेल, मीठ .
कृती: सर्वप्रथम मटारचे दाणे मिक्सर मध्ये जाड बारीक भरडून घेणे हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेणे तेलाला हिंग मोहरी कढीपत्ता कोथिंबीर फोडणी देऊन आखे धने थोडेसे भरडून हातावर बडिशोप परतून घ्या नंतर त्याच्यात वाटलेली हिरवी मिरचीची पेस्ट टाका ती परतली गेली का मग त्याच्यावर धणा पावडर गरम मसाला हळद टाकून परतून घ्या वाटलेला वाटाण्याची भरड टाकून छान परतून घ्या मग त्याच्यात चाट मसाला दोन चीमुट मिरेपूड लिंबूचा रस आमचूर पावडर टाकून छान परतून घ्या साखर आवडीनुसार मीठ छान दहा मिनिटं वाफवून घ्या मग हे सारं थंड व्हायला ठेवून द्या
आता पारीसाठी आपण पिठ तयार करू मैदा 2 मोठ्या वाट्या मीठ त्याच्यावर तेलाचं मोहन टाकून पीठ छान भिजवून घ्या जास्त घट्ट नको आहे आणि पातळही नको आहे मध्यम पीठ पाहिजे आहे दहा ते पंधरा मिनिटे पीठ झाकून ठेवा नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या बारा ते तेरा कचोऱ्या तयार होतात ज्यांना कचोरी बनवता येत नाही त्यांनी गोल पुरीसारखे लाटून मधोमध कापून समोसा चा आकार देऊन समोसे करू शकतात किंवा करंजी सारखं भरून करंजी करू शकतात टेस्ट तशीच राहते खूप सुंदर लागते गरम मिडीयम तेलामध्ये तळून घ्या तयार तुमच्या ओल्या मटार कचोऱ्या..