आज रंगणार भारत आणि नेदरलँड मध्ये सामना

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर १२फेरीत पाकिस्तान बरोबर भारताने अखेरच्या षटकात सामना जिंकला. या सामन्यांत विराटने खेळलेल्या स्फोटक खेळीमुळे भारताला विश्वचषकाची विजयी सुरुवात करता आली. ही विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया आज पुन्हा मैदानात उतरणार आहे. हा सामना सिडनीमध्ये नेदरलँडविरुद्ध होणार आहे.

भारता विरुद्ध नेदरलँड यांच्यात होणाऱ्या सामन्यांआधी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे मीडियाजवळ बोलताना नेदरलँडविरुद्धच्या सामन्यांत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल होणार का या प्रश्नावर उत्तर देताना आगामी सामन्यांत प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला या सामन्यात आराम दिला जाईल असं सांगण्यात येत होतं.मात्र या सर्व अफवा असल्याचं पारस म्हांब्रे यांनी सांगितले.

दरम्यान आजचा सामना हा सिडीनी मध्ये दुपारी १२:३० वाजता सुरू होणार आहे.

आजच्या मॅच साठी संभाव्य भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविचंद्र अश्विन, दिनेश कार्तिक, हर्षदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, शमी, अक्षर पटेल

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा