मतदानासाठी ‘म्हैसूर शाई’च्या 3 लाख बाटल्यांचं वाटप

Every vote counts - Being the responsible citizen that I am, on my short trip to India, I got a chance to vote for BMC Election. Yay !!!
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ‘म्हैसूर शाईच्या’ तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
  विशेष : मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच 15 सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही  प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील ‘म्हैसूर पेंटस् अ‍ॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनी’ मध्ये तयार केली जाते.
  ‘म्हैसूरची शाई’ : म्हैसूर शाई तयार करणारी ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. त्यामुळे या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखले जाते.
 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांत 96 हजार 661 मतदान केंद्र असतील. या सर्व केंद्रावर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचविण्याचे काम सुरु आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा