मतिन भोसले आणि रामभाऊ इंगोले राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने सन्मानित

नागपूर, २ मे २०२४ : श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने आज राष्ट्रसंताचा जन्मदिवस अर्थात ग्रामजंयती महोत्सव साजरा करण्यात आला. या ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. त्या अनुषंगाने मतिन भोसले आणि रामभाऊ इंगोले यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्धल अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्कार आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद रोही यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना अभिजीत वंजारी यांनी सर्वधर्म समभाव वाढविण्यासाठी महाराजांच्या विचारांचा प्रचार होणे आवश्यक आहे, असे सांगितले. तर श्रीगुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष अँड.अशोक यावले यांनी शासन दरबारी राष्ट्रसंताच्या विचारांबाबत असलेली उदासीनता दुख:द आहे अशी खंत व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. रामदास टेकाडे यांनी केले. या कार्यक्रमाला विठ्ठल पुनसे, अनिल पडोळे, मा. जावेद पाशा, लिना निकम, मा. नाना महाराज, रुपराव वाघ, सौ. संगिता जावळे, बाळ पदवाड, सुरेंद्र बुराडे, रामराव चोपडे, देवीदास लाखे उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार सियाराम चावके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंनद माथने, राजु पवार, विठ्टलराव तळवेकर यांनी परिश्रम घेतले.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा