बुलडाणा जिल्ह्यात मातृ वंदना योजना ही एक पर्वणी ठरली

बुलडाणा, ८ ऑक्टोबर २०२० बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजने अंतर्गत गेल्या एक वर्षाच्या कालावधीत ४४ हजार ६३० मातांना याचा लाभ मिळाला आहे.

आतापर्यंत १८ कोटी १५ लाख ३१ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. गरोदर मातेला पौष्टिक आहार मिळण्याकरिता आर्थिक मदत मिळावी, हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये १ एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० या कोरोना संकटाच्या काळात ५ हजार १२० गरोदर मातांना दोन २ कोटी ९७ लाख ९० हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक पर्वणी ठरली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा