मौजे तांदुळवाडीतील नागरिकांना वस्तूंचे वाटप

14

उस्मानाबाद : सध्या सर्वत्र कोरोनाची धास्ती पसरली आहे. तरी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये या साठी पोलिस कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत.

मौजे तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी देखील या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि तसेच गावातील नागरीकांना योग्य त्या सूचना दिल्या.
तसेच परिसरातील नागरिकांना राणा जगजितसिंह पाटील यांच्यातर्फे १०० मास्क तसेच ५० सॅनिटायझरचे नागरिकांना वाटप करण्यात आले.
गावागावात देखील या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी गावातीलच काही मुख्य सदस्य पुढे येऊन काम करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व नागरिक स्वतः पुढे येऊन आपापल्या परीने मदत करत आहेत. विभागातील नेते तसेच मोठी मंडळी ही पुढाकार घेऊन आवश्यक अशा वस्तूंचे वाटप करत आहेत.


न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड