गोल पोस्ट अर्थ उद्योग वेदांता फॉक्सकॉन कंपनीकडे मविआ सरकारने टक्केवारी मागितली? शेलारांचा गंभीर आरोप

वेदांता फॉक्सकॉन कंपनीकडे मविआ सरकारने टक्केवारी मागितली? शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई, १७ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्रात उभारण्यात येणारा वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातला गेल्यामुळे आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप व जबाबदारी एकमेकावर ढकलण्याचे राजकारण चालू आहे. या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांता फॉक्सकॉन कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप ट्विट करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे केला आहे.

आशिष शेलार हे ट्विटमध्ये बोलतात की गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती, एवढा भ्रष्टाचार मोठा झाला आहे, असा गौप्य स्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा दीड लाख कोटींचा होता मग इथं किती टक्के मागितले होते. १० टक्के नुसार हिशेब मागितला जात होता का? महापालिकेच्या रेटने मागणी होत होती का? ये सब गोलमाल है! याची चौकशी झाली पाहिजे आणि हे सगळं सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे.

वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प मोठा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यात आधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे आणि त्यात आता आशिष शेलार यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पण, मागचं महाविकास आघाडीचे सरकार आणि आणि आत्ताचं शिंदे फडणवीस सरकार हे दोघेही हा प्रकल्प जाण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसत आहे. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर पंतप्रधान मोदींना संवाद साधला आहे आणि त्यांनीही महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा येईल याची शक्यता नाही पण महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प भेटतो का हे पाहणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version