गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मविआची पंढरपूर बंदची हाक! जाणून घेऊ शहरातील आजची स्थिती

मविआची पंढरपूर बंदची हाक! जाणून घेऊ शहरातील आजची स्थिती

पंढरपुर, १९ डिसेंबर २०२२: महापुरूषांचा अपमानाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्यावतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे‌. या बंदला पंढरपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद दिसून येत आहे. तर दुसरीकडे मंदिर परिसरातील सर्व दुकाने सुरु आहेत.

महापुरूषांच्या अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने पंढरपूरमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट सहभागी झाले आहेत.

पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असून या बंदमुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version