मयंक बाहेर, सैनीचे पदार्पण, सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा

सिडनी, ६ जानेवारी २०२१: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी गुरुवारपासून सिडनी येथे खेळली जाईल. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. रोहित शर्मा परतला आहे. तो संघाचा उपकर्णधार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाकडे सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) ४३ वर्षानंतर कसोटीत जिंकण्याचे आव्हान असेल. यासह वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पदार्पण करेल.

मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पराभूत केले. यापूर्वी टीम इंडियाला अ‍ॅडलेडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, तेथे दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांवर पूर्ण संघ बाद झाल्याने नामुष्कीचा सामना करावा लागला होता.

‘हिटमॅन’ संघाला बळकटी देईल

सलामीचा खेळाडू मयंक अग्रवाल बाहेर झाला आहे. संघाला बळकटी देण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा परतला आहे. केएल राहुलच्या दुखापतीनंतर हनुमा विहारी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी आहे. विहारीला शेवटच्या तीन डावात ४५ धावा करता आल्या. ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे.

सिडनी कसोटी: प्लेयिंग इलेव्हन खालीलप्रमाणे

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी (डेब्यू).

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा