कुर्डूवाडीत सोमवारपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित नगराध्यक्ष

कुर्डूवाडी (मधा, सोलापूर), दि. १९ जुलै २०२०: माढा तालुक्यातील सर्वात मोठे शहर व रेल्वे जंक्शन असलेल्या कुर्डूवाडी शहरात गेल्या चार दिवसापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरात सगळीकडे भीतिदायक वातावरण पसरले आहे. शहरात आतापर्यंत दहा रुग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडी शहरात दि.२० ते २७ जुलै पर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने नियमितपणे बंद राहतील अशी माहिती नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सकाळी ७ ते ९ दूधव्यवसाय,९ ते १२ या वेळेत खते बियाणांची दुकाने सुरु ठेवण्यात येतील

कै.काशीनाथ राव भिसे सभागृहात व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये त्याचबरोबर व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन जनता कर्फ्यूचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान धनंजय डिकोळे यांनी केले.

यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, प्रभारी मुख्याधिकारी कोल्हे, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगन, रणजीत शिंनगारे, राजु धोका, आनंद टोणपे, चंद्रकांत वाघमारे, रविंद्र ढवळसकर, राहुल धोका, टीनू भेंडकर, यासीन शेख रफीक शेख यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा