प्रकृती बिघडल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबई, दि. २९ जून २०२०: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने त्यांनाबॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येतीत बिघाड असल्याने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. मात्र आज त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

किशोरी पेडणेकर यांनी परिचारिका विषयी प्रशिक्षण घेतले होते आपल्या अनुभवाचा या संकटाच्या काळात उपयोग व्हावा म्हणून त्यांनी कोविड -१९ रुग्णालयांमध्ये सेवा देण्याचे ठरवले होते व तसे त्यांनी केले ही होते. मुंबईतील नायर रुग्णालय मध्ये त्यांनी परिचारिका म्हणून आपली जबाबदारी बजावली होती.

इतकेच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन आणि कोरोना काळात मुंबईतील अनेक रुग्णालये आणि हॉटस्पॉट्सना भेटी दिल्या. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर उतरुन आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्ध्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केले. यादरम्यान त्यांनी केईएम, नायर, शताब्दी यासारख्या रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा