मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी नोटीसवर प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केला. काही लोकांना कर्ज मिळावे यासाठी शरद पवार यांनी शिखर बँकेला पाठवले होते. असे विधान त्यांनी केले होते.
‘या’ पत्राने अपात्र लोकांनाही कर्ज दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आपण कधीही कोणत्याही संस्थेला पत्र पाठवले नसल्याचे स्पष्टीकरण देऊन मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
अडचणीत आलेल्या बँकांसाठी नियमांच्या आधारावर राज्य सहकार बँकेने काही संस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतला. आपण बँकेचा संचालक नसल्याने या बँकेच्या निर्णय प्रक्रियेशी आपला संबंध नाही, असेही ते म्हणाले.